तुम जियो हजारों साल
ND |
प्रथम श्रेणीत मुंबईकडून पदार्पण करताना गुजरातविरुद्ध शतक.
इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफोर्ड येथे कसोटीतील पहिले शतक
भारताकडून विश्वचषक खेळणारा सर्वात तरुण खेळाडूचा मान.
१९९६ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू.
न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद यथे पहिले द्विशतक.
डॉन ब्रॅडमनचा २९ शतकांचा विक्रम मागे टाकला.
एकदिवसीय १५ हजार धावांचा टप्पा पार. कसोटीत ११ हजार धावांचा टप्पा गाठला.
र्ल्डकप जिकला. शतकांच्या महाशतकापासून फक्त एक शतक दूर.
असामान्य आणि अलौकिक गुणवत्ता असलेल्यांना वयाचे, वेळेचे बंधन नसतेच. सचिनबरोबर 1989 मध्ये कसोटी पदार्पण केलेला पाकिस्तानचा वकार युनुस आत्ता केस पिकून प्रशिक्षक झाला आहे; पण सचिन रोज नव्या विक्रमांची गाथा रचत आहे, त्याची गुणवत्ता आणखीनच झळाळून उठत आहे. त्याच्या नावाचा झेंडा नवनव्या यशोशिखरांवर फडकत चालला आहे... देशाला विश्वकरंडक मिळवून देण्याचे ते स्वप्न होते. वाढदिवस असलेल्या एप्रिल महिन्यातच हे सुवर्णस्वप्न पूर्ण व्हावे हा दैवाने त्याला दिलेला आशीर्वादच आहे.
