1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

दुखापतीमुळे सचिन परतणार मायदेशी!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्नायूदुखापतीमुळे पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील उरलेले तीन सामन्यात खेळणार नसून तो लवकरच मायदेशी परतणार आहे.

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवड चोवीस तासांवर आली असताना मास्टर ब्लास्टर सचिनची दुखापत चिंतेचा विषय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसर्‍या वन डेत 24 धावांच्या खेळीदरम्यान सचिनच्या उजव्या गुडघ्यातील स्नायू दुखावले. त्याच्या जागी यष्टिरक्षक पार्थिव पटेल याची निवड करण्यात आली.