न्यूझीलंडचा जोरदार विजय!
येथील सरदार पटेल स्टेडिअमवर "अ' गटात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने झिंबाब्वेवर १० गडी राखून जोरदार विजय मिळविला आहे.
झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु, झिंबाब्वेची सुरवात खराब झाली. पहिल्या पंधरा षटकांमध्येच ४६ धावांवर पाच गडी गमावल्यानंतर ४६.२ षटकांत १६१ धावांवर पूर्ण संघ गारद झाला. झिंबाब्वेकडून ब्रेंडन टेलरने सर्वाधिक ४४ धावा केल्या.
न्यूझीलंडने ३३.३ षटकांमध्येच दणदणीत विजय मिळविला. न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टिलने ८६ तर ब्रेंडन मॅक्लमने ७९ नाबाद धावा केल्या.