1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

भारत 201, विंडीज 3 बाद 30

पहिल्याच दिवशी 13 विकेट पडलेली भारत विंडीजमधील दुसरी कसोटी रंगतदार आणि निकाली होणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे. टॉस जिंकून वेस्ट इंडिजने गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला 201 धावांत गुंडाळले. पण त्यानंतर उसळत्या खेळपट्टीचा पुरेपूर लाभ उठवत भारतीय गोलंदाजांनी विंडीजची अवस्था 3 बाद 30 अशी केली आणि सामन्याचा निकाल कुणाच्याही बाजुने झुकू शकतो याचे प्रत्यंतर दिले.

दुस-या सामन्यासाठी वेस्टइंडीजने ब्रेंडान नॅश ऐवजी मार्लन सॅम्युल्सला टीममध्ये घेतले तर भारताने अमित मिश्राच्या जागी अभिनव मिथुनला संधी दिली. मुरली विजय, अभिनव मुकुंद पहिल्या कसोटीत शतक झळकवणारा द्रविड आणि कोहली पाठोपाठ गेल्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 38 अशी झाली. पण भरवशाचा लक्ष्मण आणि रैना यांनी पाचव्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. किरकोळ वाटणा-या २०१ धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. इशांत शर्माने बराथला तर प्रवीण कुमारने सिमन्सला बाद करत यशस्वी सलामी दिली. पाठोपाठ मिथुनने ब्राव्होला बाद करुन विंडीजला चांगलाच धक्का दिला.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा