1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

मोदींच्या सुनावणीस नकार!

PTI
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी "आयपीएल'चे निलंबित आयुक्त ललित मोदींच्या चौकशीला स्थगिती देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) याचिका फेटाळून लावली. "आयपीएल'मधील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिस्तपालन समितीसमोर मोदी यांची चौकशी चालू होती. त्यानंतर चौकशी समिती बदलण्याची मागणी करतानाच मोदी यांनी चौकशीच्या कामकाजासच स्थगिती मिळविली होती. त्या निर्णयाला "बीसीसीआय'ने आव्हान दिले होते.

"ही याचिका आमच्यासमोर नको' अशा शब्दांत खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनी सुनावणीस नकार दिला. सुट्टीतील न्यायालयासमोर गेल्या 27 डिसेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये ही याचिका खंडपीठासमोर ठेवण्याची सूचना केली होती. यानंतर "बीसीसीआय'ने उच्च न्यायालयासमोर नव्याने याचिका दाखल केली आहे. आता ही याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर ठेवली जाईल.