विंडीजचा १८ धावांनी पराभव!
ND |
त्यानंतर आलेल्या टिम ब्रेसनननेही राईटला चांगली साथ दिली. या दोघांनी संघाची धावसंख्या २१६वर पोहोचविल्यानंतर बिशूने राईटला ४४ धावांवर बाद केले. त्यानंतर ब्रेसननने आक्रमक खेळ करताना ग्रॅमी स्वान ०८ आणि ख्रिस ट्रेमलेट ०३च्या साथीने संघाला २४३ धावांपर्यंत पोहोचविले. रसेलने स्वानला ०८ धावांवर बाद केले, तर रोचने ट्रेमलेटला ०३ धावांवर बाद करून ४८.४ षटकांत इंग्लंडचा डाव २४३ धावांवर संपुष्टात आणला. ब्रेसनन २० धावांवर नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करणार्या विंडीजने धडाकेबाज सुरुवात करताना केवळ ४.५ षटकांतच संघाचे अर्धशतक पूर्ण केले; परंतु विंडीजच्या ५८ धावा झाल्या असताना जेम्स ट्रेडवेलने केवळ २१ चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा काढणार्या ख्रिस गेलला पायचीत केले आणि विंडीजच्या फलंदाजांचे 'तू चल मी येतो' सुरू झाले. थोड्याच वेळाने ट्रेडवेलने डेव्हन स्मिथला १० धावांवर बाद केले. त्यानंतरही कर्णधार डेरेन सामीने आक्रमकच खेळ केला; परंतु संघाच्या ९१ धावा झाल्या असताना ट्रेडवेलने स्मिथ बाद झाल्यानंतर आलेल्या डेरेन ब्राव्होला बाद केल्याने विंडीज संघ अडचणीत आला. ब्राव्होने संथ खेळ करीत १५ चेंडूत केवळ ०५ धावा काढल्या. डेरेन सामीचा आक्रमक खेळ पाहून स्ट्रॉसने गोलंदाजीत बदल करीत रवि बोपाराच्या हाती चेंडू सोपविला आणि त्याची ही चाल यशस्वी ठरली. बोपाराने पहिल्याच षटकांत २९ चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांसह ४१ धावा काढणार्या सामीला, तर दुसर्या षटकात थॉमसला १० धावांवर बाद करून विंडीजची अवस्था पाच बाद ११८, अशी दयनीय केली. विंडीजच्या १५० धावा झाल्या असताना ग्रॅमी स्वानने घातक केरॉन पोलार्डला २४ धावांवर पायचीत केले. त्याचवेळी विंडीजचा पराभव दृष्टिपथास आला; परंतु आंद्रे रसेलने रामनरेश सारवानच्या साथीने दमदार खेळ करीत विंडीजच्या आशा पुनरुज्जीवित केल्या.
या दोघांनी सातव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केल्यामुळे विंडीज हा सामना जिंकेल, असा विश्वास निर्माण झाला; परंतु रसेल ४९ धावा काढून बाद झाल्यानंतर रामनरेश सारवानसह उर्वरित तीन फलंदाज केवळ तीन धावांची भर घालून तंबूत परतल्याने विंडीजचा डाव ४४.४ षटकांत २२५ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने हा सामना १८ धावांनी जिंकला. इंग्लंडकडून ट्रेडवेलने सर्वाधिक चार, ग्रॅमी स्वानने तीन, तर रवि बोपाराने एक गडी बाद केला.
