शिलिगफोर्ड निलंबित
वेस्ट इंडीजचा ऑफ स्पिनर शेन शिलिंगफोर्डवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संशयास्पद गोलंदाजीच्या अॅक्शनवरून आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे. आयसीसीने विविध तपासण्या केल्यानंतर गोलंदाजी करताना शिलिगफोर्डचा हात कोपरापासून 15 अंश निर्धारित केल्यानंतर तो 17 अंशापर्यंत वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

