शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

सचिन तेंडुलकर पत्नीसह मातोश्रीवर

ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीसह सोमवारी रात्री उशीरा ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्था नी दाखल झाला. मात्र यावेळी त्याने युवासेनेचे अध्यक्ष आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

शनिवारी बाळासाहेबांचे निधन झाले, त्यावेळी सचिन टेस्ट मॅचसाठी अहमदाबादला असल्यामुळे तो मुंबईत येऊ शकला नव्हता. त्यावेळी बाळासाहेबांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असे त्याने ‍ट्विटरवर म्हटले होते. शिवाय बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वत: उपस्थित राहता येत नाही म्हणून खूप दु:ख होत असल्याचेही सचिन म्हणाला. यापार्श्वभूमीवर त्याने सोमवारी मातोश्री गाठली.