सचिनचे शतक पुन्हा हुकले
PTI
सचिनने काल संयमी खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. आज मात्र तो मैदानावर फारकाळ टिकू शकला नाही.
पाहुण्या संघातील नवोदित खेळाडू एंडी मॅकाय याने त्याला बाद केले. सचिन 61 धावांवर तंबूत परतला आहे.
मास्टर ब्लास्टरचे 50 वे शतक सातत्याने त्याला हुलकावणी देत असून, आता दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार्या सामन्यावर त्याला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

