1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: ढाका , सोमवार, 21 फेब्रुवारी 2011 (12:57 IST)

सचिनने दाखवला मोठेपणा

सचिनने दाखवला मोठेपणा
ND
गैरसमजामुळे सचिन धावबाद झाला असला तरी त्याला फारसे वाईट वाटले नाही. कारण संघाचा विजय सचिनला जास्त महत्वाचा वाटतो, असे ‍वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. त्याने मला कॉल दिला होता, पण माझे लक्ष चेंडूकडे होते. त्यामुळे तो पळत येतो आहे हे माझ्या लक्षातच आले नसल्याचे सेहवागने सांगितले.

मी जेव्हा ड्रेसिंगरूममध्ये गेलो तेव्हा सचिन म्हणाला की जाऊ दे. देशासाठी मॅच जिंकणे महत्वाचे आहे. 200 धावांपेक्षा संपूर्ण 50 षटके खेळणे हे माझे प्रमुख लक्ष्य होते. मी त्यात बर्‍यापैकी यशस्वी झाल्याचे सेहवाग म्हणाला.