1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

हसीने सांभाळला कांगारुंचा डाव

ब्रिसबेन येथे सुरु असलेल्या एशेज मालिकेतील पहिल्या सामन्यात कांगारुंचा दबदबा वाढला आहे. सिडनने हॅट्रिक घेतल्यानंतर आता हसीने शानदार फलंदाजी करत कांगारुंचा डाव सावरला आहे.

प्रकाश कमी असल्याने दुसर्‍या दिवसाचा खेळ वेळेआधीच थांबवण्‍यात आला. खेळ संपला तेव्हा कांगारुंनी पाच गडी गमावत 220 धावा केल्या आहेत. हसी 81 तर ब्रॅड हॅडिन 22 धावांवर खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांनी कांगारुंचा डाव सावरत संयमी 77 धावांची भागिदारी केली.

इंग्लंडचा संघ पहिल्या डाव्यात केवळ 260 धावांवर बाद झाला. यानंतर कांगारुंनी खेळ सुरु केला होता.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा