1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
  6. हा सामना फायनलसारखाच होता: हरभजन

हा सामना फायनलसारखाच होता: हरभजन

विश्वकरंडक फायनल मुकाबला मुंबईत श्रीलंकेविरूद्ध होणार असला तरी पाकविरूद्धचा सेमीफायनल मुकाबला आमच्यासाठी फायनलसारखाच होता, असे फिरकीपटू हरभजन सिंह याने म्हटले आहे.

पाकवर २९ धावांनी विजयानंतर हरभजन म्हणाला, '' आज सर्वकाही आम्हांस अनुकूल राहिल्याने मी खूप आनंदी आहे''. भारतीय संघाच्या समर्थकांचेही त्याने यावेळी आभार मानले.

दोन देशांदरम्यान सामन्यात खेळताना प्रचंड दबाव असतो. आम्ही उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केल्याने विजय आमचाच होता, असेही तो म्हणाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा