गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (08:52 IST)

रेस्तरा अँड कॅटरिंग शो तर्फे भारतातील सर्वात मोठी पाककृती स्पर्धेचे आयोजन

यू. एस. क्रॅनबेरीज, वॉशिंग्टन एपल्स, यूएसए पीअर्स, कॅलिफोर्निया वॉलनट्स आणि यूएस पिकन्सची ओळख करुन देणारा वेगळा कार्यक्रम  

शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून रेस्तरा अँड कॅटरिंग (रेका) शो, यू. एस. प्रिमियम एग्रीकल्चर प्रोडक्ट्सच्या सहकार्याने सादर करत आहेत अमेरिकातील फळे व नट्सचे विविध चवदार प्रकार. चला तर मग, तय्यार रहा.. बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये २१ ते २३ ऑगस्ट २०१७ या काळात होणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमात नावण्यपूर्ण चविष्ठ पाककृती स्पर्धा होणार असून यामुळे खवय्यांची नक्कीच तृप्ती होऊ शकेल.  

यू. एस. क्रॅनबेरीज, वॉशिंग्टन एपल्स, यूएसए पिअर्स, कॅलिफोर्निया वॉलनट्स आणि यूएस पिकन्सती उपलब्धता, त्यातील वैविध्य व हे पदार्थ वापरण्याचे तंत्र याची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या फळांचा मुख्य घटक म्हणून वापर करुन खाद्यपदार्थांमध्ये भन्नाट प्रयोग करण्याचे आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणाऱ्या तारांकित हॉटेलमधील शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्टना भेटण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. त्याच बरोबर वेस्टर्न इंडिया कलिनरी असोसिएशन (डब्ल्यूआयसीए) च्या तंत्रज्ञानासोबत हॉस्पिटॅलिटी फर्स्ट ही स्पर्धा असणार आहे. या क्षेत्रातील मान्यवर वेस्टर्न इंडिया कलिनरी असोसिएशन (डब्ल्यूआयसीए) आणि हॉस्पिटॅलिटी फर्स्ट इंडिया प्रा. लि.चे प्रतिनिधी इथे परिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील.