1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. 8 हजार किमीवरून या माणसाला भेटायला येतो पेंग्विन

8 हजार किमीवरून या माणसाला भेटायला येतो पेंग्विन

एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल अशी ही बातमी आहे. ब्राझीलमधील रिओ शहरात राहणार्‍या 71 वर्षीय व्यक्तीला भेटण्यासाठी एक पेंग्विन 8 हजार किलोमीटरचा प्रवास पोहत पोहत गेली 4 वर्षे त्यांना भेटण्यासाठी येतो. कारण त्याने या पेंग्विनचा जीव वाचवला होता. त्यामुळे त्या व्यक्तीला भेटण्यासाठी प्रत्येक वर्षी तो येतो. 
 
2011 साली जाओ परेरा मासे पकडण्यासाठी समुद्रावर गेले असता त्यांनी एक पेंग्विन दगडामध्ये जखमी अवस्थेत असल्याचे पाहिले. 71 वर्षी जाओ परेरा जखमी अवस्थेत असलेल्या पेंग्विनला दगडातून बाहेर काढून 
 
आपल्या झोपडीत घेऊन गेले. त्याच्या जखमा त्यांनी स्वच्छ करून त्यावर उपचार केले. जाओ परेरा यांनी त्याचे नाव ‘डिमडिम’ असे ठेवले आणि काही दिवसांत डिमडिम चांगला झाला; त्याला जणू त्या व्यक्तीचा लळाच लागला होता. पण त्याच्या शरीराच्या अनुकूल हवामानासाठी त्याला परत त्यांच्या जागी सोडून दिले. 
 
2011 नंतर तोच पेंग्विन 8 हजार किलोमीटर प्रवास करून जाओ परेराला भेटण्यासाठी परत आला. 8 महिने त्याच्यासोबत राहिल्यानंतर तो परत गेला आणि प्रत्येक वर्षी डिमडिम जाओ परेरा यांना भेटण्यासाठी येतो; आणि 7 ते 8 महिने त्यांच्याजवळ राहतो.
पुढील लेख
विमान अपघातातील मोहम्मद यांना 7 कोटी रुपयांची लॉटरी