1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी

14 May
शौर्य, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक, 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना 
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
 
जगावे तर शंभू राजांसारखे आणि लढावे तर शंभू राजांसारखे... 
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन... 
हेच तर आहे संभाजी राजांचे वर्णन. शंभू जयंतीच्या शुभेच्छा!
 
ज्यांच्या मनगटात वाघाचे बळ आणि काळजात स्वराज्याचे प्रेम होते, 
अशा थोर पराक्रमी संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन!
 
पुत्र असावा तर शंभू राजांसारखा, 
जो रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत 
स्वराज्याशी आणि धर्माशी एकनिष्ठ राहिला
शिवपुत्र संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
 
मुघलांच्या काळजात धडकी भरवणारे 
आणि स्वराज्याचे धाकले धनी 
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
कोटी कोटी नमन त्या छाव्याला,
ज्याने झुकले नाही मस्तक औरंगजेबाच्या दारात,
शंभूराजांच्या जयंतीनिमित्त,
सर्व मराठा मावळ्यांना शुभेच्छा!
 
सह्याद्रीचा सिंह तो, मराठ्यांचा मान,
शिवबाचा छावा शंभू, आमचा अभिमान...
॥ जय शंभूराजे ॥
 
इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे 'शंभूराजे'... 
आपल्या पराक्रमाने दिल्लीचे तख्त हलवणाऱ्या राजाला मानाचा मुजरा!
 
संस्कारांचा वारसा आणि शौर्याचा कळस, 
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या उत्साहात शुभेच्छा!
 
ना शिवबा विसरू शकू, ना शंभू राजांचे बलिदान... 
या मातीचा प्रत्येक कण आजही गातोय संभाजी राजांचे गुणगान!
 
संस्कृतचे पंडित आणि रणांगणाचे वाघ, 
स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना 
जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
पराक्रमी योद्धा, स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे शिवपुत्र,
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
शत्रू समोर झुकले नाही, धर्मासाठी प्राण दिले... 
अशा महान राजाचे विचार आपण सदैव जपूया
शंभू जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
सह्याद्रीचा छावा, स्वराज्याचा दिवा... 
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!
 
ज्यांनी धर्म रक्षणासाठी आपले बलिदान दिले,
अशा पराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना,
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही... 
हा स्वाभिमान शिकवणाऱ्या शंभू राजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
 
ज्यांचे नाव घेताच अंगावर रोमांच उभे राहतात, 
त्या अजेय योद्धा छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
 
स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना, 
महापराक्रमी शंभू राजांना 
जयंतीनिमित्त अभिवादन
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय!
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा
पुढील लेख
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण