13000 प्रकाशवर्षे दूर गोठलेला ग्रह!
पृथ्वीपासून १३ हजार प्रकाशवर्षे अंतरावरील एक गोठलेला ग्रह नासाच्या शास्त्रज्ञांना सापडला असुन तो आकाराने पृथ्वीएवढा असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रहास संशोधकांनी 'ओगल-२0१६-बीएलजी-११९५बी' असे नाव दिले आहे. मायक्रोलेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे हा ग्रह सापडल्याचे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीतील संशोधक योस्सी श्वार्त्झवाल्ड म्हणाले. या ग्रहाचा तारा अत्यंत मंद असून तो आकाराने आपल्या सूर्याच्या केवळ ७.८ टक्के इतकाच असल्याचे संशोधक म्हणाले. हा ग्रह त्याच्या तार्यापासून पृथ्वीइतक्याच अंतरावर असला तरी तारा मंद असल्यामुळे तो अतिथंड असल्याचे संशोधक म्हणाले. आपल्या सौरमालेतील प्लुटोप्रमाणे या ग्रहावर अत्यंत थंड वातावरण असावे असे संशोधक म्हणाले.