ganesh chaturthi
✕

अंधश्रद्धा चूक की बरोबर

Updated: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (09:20 IST)
आज देखील अंधश्रद्धेची बरीच कारणं आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या समस्येने वेढलेला आहे. त्यामुळे अशा लोकांना फसवणे या भोंदू बाबांना सहजच शक्य असत. कोणाला मुलं होत नाही, तर कोणाची ऑफिसात प्रगती होत नाही, तर कोणाचे व्यवसाय सुरळीत चालत नाही. काही न काही समस्याने सगळे वेढलेले आहे. या अंधश्रद्धेचे बळी शिकलेले आणि अशिक्षित दोन्ही लोक ठरतात.
 
काही काही फसवे भोंदू बाबांमुळे मुलांची बायकांची बळी देखील देण्यात येते. बरीच लोक काळा जादू करून आपला हेतू साध्य करतात. अमावास्येला केस मोकळे सोडून फिरू नये, दृष्ट लागणे,भूत बाधा होणे. अशी कारणे सांगितली जातात. काही लोक स्वतःचे चांगले करण्यासाठी लोकांची बळी देतात. याला रोखण्यासाठी सरकार ने एक कायदा काढला आहे याच्या अंतर्गत असे तंत्र मंत्र ज्यामुळे माणसाच्या जीवाला धोका आहे हे अक्षम्य दंड आहे. आज देखील बऱ्याच गावांमध्ये एखाद्या आजारी माणसाला रुग्णालयात नेण्या ऐवजी तंत्र मंत्र करून बरं करण्याचा अट्टाहास केला जातो. 
 
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 (A)नुसार प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी विज्ञान आणि मानवतावादाच्या भावनेला महत्त्व द्यावे. अंधश्रद्धा रोखण्याचे एक यशस्वी उपाय आहे की असे काम करताना कोणी ही आढळले तर आपल्याला पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे. आपल्याला शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी लघु नाट्य आणि पथनाट्य केली पाहिजे जेणे करून कोणी ही अंधश्रद्धेला बळी पडू नये. आपण सर्वांनी तर्कशास्त्र आणि विज्ञानानुसार विचार केले पाहिजे. आपली विचारसरणी तर्कसंगत असावी. सर्वानांच आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. नशीब- दुर्देव हे विधिलिखित असत. जर दुर्देव नसेल तर नशीब ओळखणे कठीण होईल. मुलीचं नसतील तर मुलांशी लग्न कोण करेल. आज देखील सर्वानांच मुलगा हवा असतो, पण ते हे विसरतात की या मुलांना जन्म देणारी देखील एक बाईचं असते.
 
अंधश्रद्धे पासून मुक्त होण्यासाठी देशातील सर्व नागरिकांना पुढे यावे लागणार. प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही समस्या असतातच  पण ह्याच्या अर्थ असा नाही की त्याला सोडविण्यासाठी आपण भोंदू बाबांच्या  आहारी जावे. प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे की असे ढोंगी,भोंदू आणि फसवे लोक पैसे उकळताना दिसल्यास त्वरितच पोलिसांना कळवावे आणि आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. हे या देशातील सुजाण नागरिक म्हणून हे आपले कर्तव्य आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

देसी SUV चा दबदबा! ३० दिवसांत १७,३१३ गाड्यांची विक्री; पाहा टॉप-१० यादी

तुळजा भवानी मंदिरातून देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या तीन भाविकांचा रस्ते अपघातात मृत्यू

सोने-चांदीचे आजचे दर: खरेदीपूर्वी २२ आणि २४ कॅरेट भाव तपासा

मुंबईसह महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये वाढता उकाडा; हवामानाबाबत ताजे अपडेट

LIVE: ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्य आता भव्य स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले जाईल

पुढील लेख
Show comments