1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (10:24 IST)

'गाय' वर लघु निबंध

Essay on Cow in Marathi
प्राचीन काळापासूनच आपल्या हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे. आपल्या इथे गायीला आईचा मान दिलेला आहे. प्राचीन काळापासूनच गाय माणसाला मदतच करत येत आहे. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी गायींना पाळत होते. आणि कामधेनू म्हणून गाय त्यांचा सांभाळ करायची.
 
गाय एक साधी भोळी प्राणी असते. गायीचे दूधच नव्हे तर शेण देखील कामी येत. गाय गवत खाते. ही एक पाळीव प्राणी आहे. ही कधीच कोणाला त्रास देतं नाही. बरेच लोकं आपल्या घरात आपल्या फायद्या साठी पाळतात.
 
हिला दोन शिंग, दोन डोळे, दोन कान, एक नाक, चार पाय, एक तोंड, एक शेपूट असते. ही वेगवेगळ्या रंगामध्ये आढळून येते. ही शाकाहारी प्राणी आहे. ही दूध देणारी प्राणी आहे. हिचे दूध खूप पौष्टिकं असत. आपली प्रतिकारक शक्तीला वाढवतं. हिच्या शेणापासून पेपर देखील बनवले जातात. गायीचे गोमूत्र देखील औषधाच्या रूपात वापरले जातात. या मुळे बरीच आजार दूर होतात.
 
भारतात बऱ्याच गायी रस्त्यांवर फिरतात. त्यांना त्यामुळे आजार होतात. बऱ्याच वेळा अपघातांमध्ये त्या मरण पावतात. गायींना मारले देखील जाते. पण सध्याच्या काळात गायीच्या सुरक्षेसाठी बरीच संघटने आहेत. ते गायीचे संरक्षण करतात. आपल्याला गायीचे सन्मान केले पाहिजे. तिचे संरक्षण केले पाहिजे.