सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (16:33 IST)

महात्मा ज्योतिबा फुले

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. यांच्या आईचे नाव चिमणाबाई आणि वडिलांचे नाव गोविंदराव होते. त्यांचे कुटुंब फुलांचे व्यवसाय करायचे. ते सातारा येथून फुले पुण्याला आणून फुलांचे गजरे बनवायचा व्यवसाय करत असे. त्यामुळे त्यांची पिढी 'फुले' नावाने ओळखली जात असे.
 
ज्योतिबा खूप हुशार होते. त्यांचे शिक्षण मराठी भाषेतून झाले. प्राथमिक शिक्षण केल्यावर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्यांची बुद्धी फार तल्लख होती. ते एक महान क्रांतिकारक, थोरले विचारवंत, समाजसुधारक, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. वयाच्या 13 व्या वर्षी सन 1840 मध्ये त्यांचे लग्न सावित्रीबाईंशी झाले. त्यांना अपत्ये नव्हते त्यांनी काशीबाई नावाच्या एक विधवेचे मूल यशवंत यांना दत्तक म्हणून घेतले.
 
महाराष्ट्रात धार्मिक सुधारणेची चळवळ जोरात सुरू असे त्यांनी जातीवादाचा विरोध करण्यासाठी आणि एकेश्वरवाद याची अंमलबजावणी करण्यासाठी 'प्रार्थना समाजाची स्थापना केली. याचे अध्यक्ष गोविंद रानडे आणि आर जी भांडारकर असे. 
 
त्याकाळी महाराष्ट्रात जाती-व्यवस्था मोठ्या प्रमाणात पसरली होती. लोक स्त्री शिक्षणाला घेऊन उदासीन होते, अशा परिस्थितीत ज्योतिबा फुले यांनी समाजातील या कुप्रथेचा नायनाट करण्यासाठी व्यापक प्रमाणावर आंदोलन केले.
 
समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जोगेश्वरीच्या बोळातील चिपळूणकरांच्या वाड्यात १८४८ साली पहिली मुलींची शाळा काढली. त्यांनी भारतात मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू करून तेथील शिक्षिकेची जवाबदारी आपल्या पत्नी सावित्री बाई फुले यांना सोपविली. 
 
स्त्रीशिक्षणाच्या आग्रही प्रयत्नामुळे समाजाचा प्रचंड रोष त्यांना व त्यांच्या पत्नीला सहन करावा लागला. सामाजिक बहिष्कारामुळे त्यांना घराबाहेर देखील काढण्यात आले. 
 
नंतर ज्योतिबांनी मीठगंज भागात १८५१ साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. अभागी स्त्रियांसाठी त्यांनी १८६३ साली 'बालहत्याप्रतिबंधक गृह' सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. 
 
या प्रमुख सुधारण्याच्या चळवळी व्यतिरिक्त प्रत्येक क्षेत्रात छोट्या-छोट्या हालचाली सुरू होत्या. त्यांनी लोकांमध्ये सामाजिक आणि बौद्धिक पातळीवर सुधारण्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरू केले. त्या मुळे लोकांमध्ये नवी विचारसरणी आणि नवीन कल्पकतेची सुरुवात झाली जी स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांची शक्ती बनली.
 
या महान समाजसेवी यांनी अस्पृश्यतेसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या या सत्यशोधक चळवळीत त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी पाठिंबा दिला. त्यांच्या या भावनेला बघून 1888 मध्ये त्यांना 'महात्माच्या' पदवीने बहाल करण्यात आले. या थोरवंत महात्म्याचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात निधन झाले.