सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Updated : गुरूवार, 11 मार्च 2021 (18:28 IST)

स्वच्छतेवर निबंध

आज आम्ही आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व सांगणार आहोत. असे म्हणतात की जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी वास करते आणि घरात नेहमीच भरभराटी राहते. 
 
आपल्याला आपल्या सभोवतालाचीच स्वच्छता नव्हे तर स्वतःची देखील स्वच्छता करणे आवश्यक असते. जर आपण वैयक्तिक स्वच्छता केली नाही तर आपल्याला अनेक रोग होतील. 
 
दात स्वच्छ केले नाही तर ते किडतील आणि आपल्या तोंडाचा वास येईल मग कोणीही आपल्या जवळ येणार नाही. नीट नेटकी अंघोळ केली नाही तर त्वचेचे रोग होतात. तसेच शरीरातून वास येतो. केसांची निगा राखली नाही तर त्यामध्ये उवा होतात. घाण ठिकाणी आणि घाणेरड्या लोकांकडे कोणीच जात नसतं. माणसे तर काय अशा ठिकाणी लक्ष्मी देखील राहत नाही. दारिद्र्य वास करतं.
 
घरात स्वच्छता राखली नाही तर कीटक आणि रोगराही पसरते. सध्याच्या काळात कोरोना हे साथीचे रोग पसरले आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. 
 
सरकार देखील स्वच्छता राखण्याचा सल्ला देत आहे. वारंवार हात धुवा जेणे करून कोरोनाचा आपल्यावर काहीच दुष्प्रभाव होणार नाही. 
 
आपले पंत प्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवले आहेत. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. आपल्याला चांगल्या आरोग्य आणि निरोगी जीवन जगण्यासाठी अवलंबवायची आहे. स्वच्छता राखणे एक पुण्याचे काम आहे. आपल्याला वैयक्तिक स्वच्छतेसह, पाळीव प्राण्याची स्वच्छता, आपल्या सभोवतालाची स्वच्छता आणि कार्यक्षेत्राची स्वच्छता राखायला हवी. 
 
झाडं कापायला नको. आपल्या पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यासाठी झाडे लावावे. आपल्याला आपल्या पाल्याला स्वच्छता राखण्याची सवय लावायला हवी. पण या साठी मोठ्यांना देखील स्वच्छता राखण्याची सवय हवी. कारण लहान हे मोठ्यांचे अनुकरण करतात. म्हणून त्यांना लहानपणापासूनच ही चांगली सवय लावावी. 
 
दररोज उठून ब्रश करणं, अंघोळ करणं, नख कापून त्यांना स्वच्छ ठेवणं, स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालणं, चांगले खाणं-पिणं, आपल्या सभोवतालीची स्वच्छता राखणं, जेवण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावे, बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धूवावे. स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यावे. बाहेरचे खाणं टाळावे. कचरा नेहमी कचराकुंडीतच टाकावा. 
 
घाणेरडे राहणारे लोक स्वतः आजारी राहतात आणि इतर लोकांमध्ये देखील रोगराही पसरवतात. सरकारने देखील या साठी विशेष कार्यक्रम राबवले आहे. तसेच काही कायदे देखील बनविण्यात आले आहे. त्या नियमांचं काटेकोर पालन करावं. आपण आपल्या परिसराची काळजी घेऊ तेव्हाच आपले देश देखील स्वच्छ होईल. 
 
स्वच्छता आपल्या शारीरिक मानसिक दृष्टया सुदृढ बनवतं. आपल्या जवळपास घाण आणि संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी आपल्याला स्वच्छतेची जवाबदारी सांभाळली पाहिजे आणि याचा महत्त्व आणि फायद्याला समजले पाहिजे. 
 
चला आपण प्रतिज्ञा करू या की आपण स्वतः घाण पसरवणार नाही आणि कोणालाही घाण पसरवू देणार नाही. आम्ही आपल्या देशातून घाण काढून फेकू आणि आपल्या देशाचे नाव उंच करू.