बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 29 एप्रिल 2023 (15:04 IST)

International Dance Day तालबद्ध पदन्यासाचा उत्कृट आविष्कार नृत्य आहे

तालबद्ध पदन्यासाचा उत्कृट आविष्कार नृत्य आहे,
देवाला आळवणी करायची ती एक कला आहे,
अभ्यासाने, निष्ठेने हा कलाप्रकार येतो,
आवड पाहिजे त्यासाठी, मगच तो आत्मसात होतो,
मनोरंजनासाठी होते प्रयोजन त्याचे,
खूप प्रकार अस्तित्वात आहे नृत्याविष्काराचे!
आनंद विभोर झाले असता नृत्य आकार घेते,
आपल्याला त्याच्या तालावर नाचायला लावते,
नृत्य कलेस अतीव मानसन्मान प्राप्त आहे,
जनमानसात आवडणारा तो कलाप्रकार आहे.!
...अश्विनी थत्ते.