या मंदिर जाण्यासाठी पुरुषांना नेसावी लागते साडी
धर्म म्हटल्यावर की विविध परंपरा आणि विविध प्रतिबंध. तसेच देशात काही मंदिर असेही आहेत जिथे महिलांच्या प्रवेशावर बंदी घातलेली आहे. पण एक मंदिर असेही आहे जिथे पुरुषांना प्रवेश करायचा असेल तर महिलेचा वेष धारण करावं लागतं.
या मंदिरात पूजा करण्यासाठी स्त्रिया, किन्नर यांच्यावर रोख नाही, परंतू पुरुषांना मंदिरात पूजन करण्यासाठी प्रवेश करायचं असेल तर बायकांसारखं सोळा शृंगार करावं लागतं. हे विशेष मंदिर केरळच्या कॉलम जिल्ह्यात आहे. श्री कोत्तानकुलांगरा देवी मंदिरात दर वर्षी चाम्याविलक्कू सण साजरा केला जातो.
या सणामध्ये दरवर्षी हजारोच्या संख्येत पुरूष भक्त येतात. त्यांना तयार होण्यासाठी वेगळं मेकअप रूम असतं. येथे पुरूष साडी नेसून दागिने घालतात. मेकअप करून केसांमध्ये गजराही मावळतात. विशेष म्हणजे या उत्सवात सामील होण्यासाठी वयाचे बंधन नाही.
किन्नरही येथे पूजा अर्चना करतात. मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असून या मंदिराला छत नाही. गर्भगृहावर छत आणि कळश नसलेलं हे राज्यातील एकमेव मंदिर असावं.
अशी मान्यता आहे की काही मेंढपाळांनी महिलांचे वस्त्र धारण करून येथील दगडावर फूल चढवले होते, नंतर तिथून दिव्य शक्ती प्रकट झाली ज्याला मंदिराचे रूप देण्यात आले. एक आणखी मान्यतेनुसार काही लोकं दगडावर नारळ फोडत असताना दगडातून रक्त वाहू लागलं आणि नंतर तिथे देवीची पूजा होऊ लागली.