शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (21:38 IST)

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती 25 मे ऐवजी 2 जून रोजी साजरी होणार

maharana pratap jayanti
सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार बुधवार दिनांक 25 मे 2022  रोजी साजरी करण्यात येणार होती. ती आता 25 मे ऐवजी 2 जून 2022 रोजी साजरी होणार आहे.
 
शासनाने दिनांक 5 मे 2022 रोजी शुध्दीपत्रक काढले असून त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार 2 जून 2022 रोजी साजरी करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांची ( तिथीनुसार ) जयंती आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्याच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे.