शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 13 जुलै 2018 (13:07 IST)

मुंबईच्या झेवियर्स मध्ये 'मल्हार' महोत्सवातून तरुणाईची धमाल

मुंबईतील कॉलेज विश्व ज्याची आतुरतेने वाट पाहतो, त्या संत झेवियर्सच्या 'मल्हार' फेस्टिव्हलची सुरुवात मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. मल्हार फेस्टिव्हलचे यंदाचे ३९ वे वर्षे असून "मल्हार २०१८: काळाची प्रवास गाथा" हि ह्या वर्षीची संकल्पना आहे. ह्यात संत झेवियर्स महाविद्यालयाचे विद्यार्थी अनेक प्री इव्हेंट्स सादर करणार आहेत. १५, १६ आणि १७ ऑगस्ट अशा तीन दिवस रंगणार्‍या या फेस्टिव्हलच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये सध्या ‘मल्हार’चीच धूम सुरू आहे.
 
इव्हेंट्स
फुटबॉल टुर्नामेंट : मल्हारचा सर्वात आवडता प्री इव्हेंट म्हणजे 'मल्हार फुटबॉल टुर्नामेंट'. ह्या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात अनेक कॉलेजचे विध्यार्थी तर भाग घेतातच पण त्याच सोबत अंध व्यक्तींना देखील सहभागी होण्याची संधी मिळते. अंध विद्यार्थ्यांना देखील अशा अनेक स्पोर्ट्समध्ये खेळण्याची संधी दिली पाहिजे ह्या हेतूने संत झेवियर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या इव्हेंटला गेल्या वर्षी पासून सुरुवात केली. या वर्षी १ जुलै रोजी ही टुर्नामेंट घेण्यात येणार आहे. 

यार्डसेल : यार्डसेल हा सामाजिक उपक्रम प्रत्येक वर्षी मल्हारमधील 'वर्कशॉप्स इंकॉर्पोरेटेड' हा विभाग आयोजित करतो. ह्या उपक्रम द्वारे, दान केलेल्या सीडी, टोप्या, पुस्तक, खेळणी, इत्यादी जमा करून त्यांची सवलतीने विक्री केली जाते आणि ह्या सेल मधून जी काही रक्कम जमा केली जाते ती एन.जी.ओ ला देण्यात येते. ह्या वर्षी यार्डसेल २९ जुलै रोजी होणार आहे.
 
मल्हार एट कार्टर्स : संत झेवियर्स महाविद्यालयाचा मल्हार हा इव्हेंट विद्यार्थी कॉलेज कॅम्पस मध्ये तर गाजवतातच पण बाहेरच्या लोकांनाही त्याची एक छोटीशी झलक किव्हा परफॉर्म करण्याची एक संधी मिळुदे म्हणून मल्हारचा 'पब्लिक रिलेशन' विभाग हा प्री इव्हेंट आयोजित करतो. 'मल्हार एट कार्टर्स' हा सगळ्याच विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखवण्यासाठी एक नवीन संधी देते. ह्यात नृत्य, गायन, नाट्य असे अनेक परफॉर्मन्स सादर करतात. या वर्षी मल्हार एट कार्टर्स २८ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 

प्रेस कॉनफेरेन्स : प्रेस कॉनफेरेन्स दरवर्षी मल्हारमधील 'पब्लिक रिलेशन' हा विभाग आयोजित करतो. ह्यात अनेक इंग्लिश व प्रादेशिक प्रकाशने येतात. प्रेस कॉन मध्ये मल्हार त्या वर्षीचे 'कॉन्फ्लुएन्स' चे लाईन अप जाहीर करते व मल्हारचे इव्हेंट्स विभाग आपापल्या इव्हेंट्स बद्दल प्रकाशनांना माहिती देतात. ह्या वर्षी प्रेस कॉनफेरेन्स २३ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

मिनी मल्हार : मिनी मल्हार हा प्री इव्हेंट संत झेवियर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मुलांना आयुष्यात एक बदल घडवून आणण्याच्या हेतूने आयोजित होतो. या वर्षी "द विशिंग फॅक्टरी" मधील मुलं संत झेवियर्स महाविद्यालयामध्ये मिनी मल्हारला येणार आहेत. हा इव्हेंट २४ जून रोजी करण्यात येणार आहे.
 
        या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर सेलिब्रिटी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या करीअरमधील यशस्वी वाटचालीचे अनुभव शेअर करणार आहेत. याचा मोठा फायदा उद्याच्या भारताचे भविष्य असणार्‍या विद्यार्थ्यांना होणार आहे. यातून त्यांच्या करीअरला दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.