शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2017 (16:27 IST)

मृत व्यक्तीचा देह घरातच जतन करून ठेवणारी जमात

जगभरात लोक आपापल्या धर्मातील रुढीनुसार एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या मृत शरीराला जमिनीमध्ये दफन करतात किंवा जाळतात. मात्र, जगामध्य अशा प्रजातीचे लोक आहेक, जे आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह घरामध्येच सजवून ठेवतात. न्यू गिनीमधील पापुआतील डोंगराळ भागात 'दानी' नावाची ही अनोखी प्रजात आहे. या प्रजातीचे लोक आपल्या पूर्वजांच्या मृत शरीराला वर्षानुवर्षे घरामध्ये जतन करून ठेवण्यासाठी ओळखले जातात. लहान मुलांवर मात्र वेळीच अंत्यसंस्कार केले जातात. असे केल्यामुळे त्यांना पूर्वजांच्या मृत शरीरासोबत अनेक दिवस बसून राहावे लागते. पहिल्यांदा मृत शरीराचे ममीमध्ये रुपांतर करण्यासाठी त्यास धुराच्या सानिध्यात ठेवले जाते. तोपर्यंत शरीराचा ममीमध्ये कायापालट होत नाही, तोपर्यंत त्यास धूर दिला जातो. धुराच्या बराच काळ संपर्कात आल्यामुळे मृतदेह अनेक वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवला जाऊ शकत. पश्चिम पापुआच्या वामेनामध्ये असलेला हा भाग 1938 मध्ये अमेरिकी भूशास्त्रज्ञ रिचर्ड आर्कबोल्ड याने पहिल्यांदा शोधला होता.