शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 30 मे 2019 (16:41 IST)

निरोगी जीवनशैली, खेळाचे महत्व, काम आणि जीवनातील समतोलपणाचे महत्व

ट्वेंटी -२०, एक दिवसीय सामना किंवा आगामी विश्व कप असो, सध्या क्रिकेटचा हंगाम सुरु असल्याचे दिसून येत आहे. क्रिकेट देशावर अधिराज्य गाजवित आला आहे. प्रसिद्ध असलेले जसलोक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर मध्ये जेएचपीएल (जसलोक हॉस्पिटल प्रीमियर लीग) आयोजित केली होती . उत्साही डॉक्टर आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या टीममध्ये बॉम्बे कॅथोलिक जिमखाना येथे बॉक्स क्रिकेट सामने खेळले गेले. वायएमसीए अनाथालय आणि जेआरडी टाटा आनंद केंद्रातील 50 मुले उद्घाटन समारंभाचा भाग होते.
 
डॉक्टर, कर्मचारी, जसलोक आणि इतर एनजीओच्या कर्मचाऱ्यांसह १७५ जणांनी जेंटलमनचा खेळ खेळला. अनाथ मुलांनी त्यांच्या आवडत्या संघासाठी चीअर केले. जसलोक हॉस्पिटल प्रीमियर लीग कॉर्पोरेट क्लायंटसह संबंध जोडण्यासाठी आणि टीम सदस्यांमधील संबंध दृढ करण्यासाठी एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म असल्याचे पाहायला मिळाले.या प्रीमियर लीग मध्ये जसलोक सर्जिकल स्ट्रायकर्स, बीएआरसी फ्यूजन डॉक, जसलोक मेडिकल मार्वल, जसलोक चॅम्पियन्स, एमडीएलडी बॅंग, जसलोक अडव्हेंजर्स, आयडीबीआय ग्लेडिएटर्स, एससीआय सी हॉक्स, ओएनजीसी डीप डायव्हर्स, आयओसीएल टॉप गिअर, एआयआर इंडिया एविएटर्स आणि यूटीआय चॅलेंजर्स या संघानी सहभाग घेतला होता. तसेच डॉक्टर्स आणि कर्मचार्यांसह आणि वायएमसीए अनाथ आश्रमातील काही स्वयंसेवी संस्थांनी क्रिकेट सामन्यात भाग घेतला होता. यूटीआय चॅलेंजर्स संघाला 'विजेता संघ' म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांना ट्रॉफी आणि २४,००० रूपयांची रोख रक्कम बक्षिस स्वरूपात देण्यात आले. जयदीप भोवाल (यूटीआय चॅलेंजर्स) हे'मॅन ऑफ दी सीरीज' ठरले, त्यांना ६००० रुपये आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
 
एक्स्ट्रा कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटीज, खेळाचे महत्व आणि कार्य- जीवनातील समतोलपणाचे महत्व अधोरेखित आणि जागरुकता करणे हा मुख्य उद्दिष्ट होता. प्रीमियर लीग मुलांसाठी खूप मनोरंजक ठरली, कारण मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह अखेर पर्यंत टिकून होता.