Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi
"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज,
ज्यांच्या कुशीत घडले,
त्या राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द शिवबांना दिली,
स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवले,
अशा स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँ साहेबांना मानाचा मुजरा!
जिजाऊ जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
मराठ्यांच्या इतिहासाचे सुवर्णपान,
ज्यांच्या संस्कारांतून घडले स्वराज्य महान...
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मुजरा माझा जिजाऊला,
ज्यांनी घडविला शिवबांला...
ज्यांनी दाखविले महिलांना बळ,
अन् दिला स्वराज्याला आधार!
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
"स्वराज्य प्रेरणेला वंदन... राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा!"
"शिवरायांच्या संस्कारांची शिदोरी देणाऱ्या जिजाऊ माँ साहेबांना मानाचा मुजरा!"
"आजच्या दिवशी जन्म झाला त्या माऊलीचा, जिने घडवला राजा साऱ्या जगाचा. जय जिजाऊ!"
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताड्यावर केला प्रहार
त्या थोर राजमाता जिजाऊला मानाचा मुजरा
राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन...
जिजाऊ यांची गौरव गाथा
त्यांच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
जय भवानी... जय शिवाजी... जय जिजाऊ
स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता
धन्य त्या स्वराज्य जननी जिजामातेला
राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमित्त अभिवादन
आपण नसता तर नसते झाले
शिवराय आणि शंभू छावा
आपल्या शिवाय नसता मिळाला
आम्हास स्वराज्याचा ठेवा
जय भवानी... जय शिवाजी... जय जिजाऊ
थोर आपले कर्म जिजाऊ
उपकार कधी ना फिटणार
सूर्य- चंद्र असेपर्यंत
नाव आपले न मिटणार
जय भवानी... जय शिवाजी... जय जिजाऊ
मुजरा माझा त्या माँ जिजाऊला
घडविले त्यांनी त्या शूर शिवबाला
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
आपलं आयुष्य ज्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं
ज्यांनी ह्या रयतेला एक न्हवे दोन छत्रपती दिले
अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
युगपुरुषाला घडवणाऱ्या
राजमाता जिजाऊ साहेब यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा