गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 27 जुलै 2023 (11:39 IST)

Red Orange Yellow and Green Alerts रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट; जाणाऱ्या या रंगांचा नेमका अर्थ तरी काय?

Red Orange Yellow and Green Alerts
R S
Red Orange Yellow and Green Alerts राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही मार्ग पाण्याखाली गेल्याने संपर्क देखील तुटला आहे.
 
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज व्यक्त केला असून त्यानुसार कोकण, गोव्यात आणि विदर्भात पुढील पाचही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, गावा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
एखाद्या भागात किती पाऊस पडणार आहे त्यानुसार हवामान विभाग त्या ठिकाणी संबंधित कालावधीसाठी अलर्ट देत असते. यासाठी चार रंगांचा वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलोआणि रेड अशा रंगाचा कोड म्हणून वापर होतो. या रंगांचा नेमका अर्थ काय असतो ते जाणून घेऊयात..
 
पहिल्यांदा पाहू रेड अलर्ट म्हणजे काय, आणि तो कधी दिला जातो..
 
१ तासात ३० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आणि पुढील २ तासात पाऊस जर सुरू रहाणार असेल तर हा रेड अलर्ट दिला जातो. ज्या वेळी जीवन आणि मालमत्तेची हानी होणार असेल तेंव्हा हा अलर्ट दिला जातो. रेड अलर्ट म्हणजे एक प्रकारे धोक्याचे चिन्हचं असतं. एखाद्या भागात अतिमुसळधार पावसाचा किंवा अतिवृष्टीचा इशारा दिला जातो, तेव्हा तिथे रेड अलर्ट जारी केला जातो.
 
आणि त्या परिस्थितीत नागरिकांना शक्यतो घरीच राहण्याच्या सूचना दिल्या जातात. तीव्र लाटांची शक्यता असल्यावरही हा अलर्ट जारी केला जातो. हा इशारा पावसाळ्यातचं न देता नैसर्गिक अपत्ती कोणतीही असो हा इशारा देण्यात येतो. एका वाक्यात सांगायचं झालं तर लोकांनां सतर्क राहण्यासाठी हा इशारा दिला जातो. धोका आधिक आसल्याने ह्या अलर्टच्या माध्यमातून महत्वाची सुचना दिले जाते.
यांनंतर पाहूयात ऑरेंज अलर्ट म्हणजे काय आणि तो कधी दिला जातो.
 
१ तासात १५-३० मिमी पाऊस पडला आणि पुढील काही तासात अजुनही एवढा पाऊस पडणार असेल तर हा अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्टला पुर्व कल्पना देणार अलर्ट म्हण्टलं जात. कोणत्याही परीस्थितीत नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगणारं हे अलर्ट असतं. या अलर्ट मध्ये विज पुरवठा खंडीत होणं, वाहतूक ठप्प होणं यासारखे प्रकार घडू शकतात, जेणे करून तुमच्या दरोरोजच्या रूटीनला यामुळे अडथळा निर्माण होऊन, गैरसोईला तुम्हाला सामोरं जावं लागु शकतं. या अलर्टमध्ये महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका असं देखील सांगितलं जातं.
 
आता येऊयात यलो अलर्टकडे..यलो अलर्ट काय असतो त्याचं काम काय आहे
 
७.५-१५ मिमी पाऊस सुरू असेल आणि पुढील २ तास सुरू राहणार असेल तर हा अलर्ट दीला जातो. यलो अलर्टचा मुख्य हेतू असतो तो सावध करण्याचा. मुसळधार पावसासाठी किंवा काहीवेळा विजांच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यास तर यलो अलर्ट जारी केला जातो. नागरिकांनी जिथे असाल तिथे सावध राहावं असं सांगितलं जात, आणि त्यांची दैनंदिन कामे रखडू शकतात आणि ते रखडू नये यासाठी असा संदेश देणारा हा अलर्ट असतो.
 
आता पाहूयात शेवटचा अलर्ट तो म्हणजे ग्रीन अलर्ट
 
हा अलर्ट म्हणजे कमी धोका असतो. सामान्य परीस्थीत दर्शवण्यासाठी हा अलर्ट काम करतो. ज्या भागात कसल्याही प्रकारचा धोका नाही. आणि जरी असेल तर लवकर तो धोका कमी होईल आणि या परीस्थीत कुठलेही निर्बंध नाहीत असा इशारा दर्शवणारा हा ग्रीन अलर्ट आसतो.
 
हे होते आपत्तीच्यावेळी दिले जाणारे सर्व अलर्टस, या अलर्टसमुळे पूर्व सुचना मिळत आसल्या कारणाने अनेकांनां सोयीचं झालं आहे. अनेक संकटांतून वाचवण्याचं काम या अलर्टसच्या माध्यामातून झालं आहे. अनेक प्रकारच्या अपत्तीमध्ये बचाव करणं यामुळे सोप्पा झालेलं आहे. आणि यामुळे प्रशासन देखील सतर्क होतं आणि नागरीकांना पर्यटन कींवा काही महत्वाच्या स्थाळावर जाण्यासाठी बंदी घातली जाते.
Edited by : Ratnadeep Ranshoor