गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (12:36 IST)

RIP विश्वास मेहेंदळे

vishwas mehendle
social media
ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालं असून वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. 
 
दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसंच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनानासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केलं आहे. दिल्ली आकाशवाणीवरून पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसंच ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालक ही होते. 
 
यशवंतराव ते विलासराव, पंतप्रधान यासह 18 हून अधिक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं आहे. शिवाय त्यांनी काही नाटकांमध्येही काम केलं आहे.