शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:30 IST)

व्यसन मुक्ती व मूल्य शिक्षण अभियानातून तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणा--डॉ सचिन परब

आजच्या तरुणाला देशाच्या विरुद्ध वापरले जात आहे.  भारत हा तरुणांचा देश आहे.  भारताची ६५% लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे.  मात्र तरुणांना व्यसनाधीन बनून भारताला महा सत्ता बनण्या बसून  थांबविण्यासाठी अनेक विदेशी शक्ती षडयंत्र करीत आहेत.  भारताच्या प्रगतीचा कणा असलेला युवकच याचे टार्गेट  बनला आहे.  कारण युवक स्वःताचे डोक चालवीत नाही, तर तो  कॉपी करतो. अनुकरण करतो.  यामुळेच युवकांना प्रचंड जाहिरातबाजी करून आकर्षीत केले जाते. जाहिरातीन मधून व्यसनाला  स्टेटस सिम्बॉल म्हणून दाखविले जाते. एका सर्वे नुसार असे सांगण्यात येते कि  भारतातील सुमारे ५५०० युवक दररोज व्यसनांच्या आहारी जात आहे.  हे सर्व थांबविण्यासाठी  शासनाने नवनवीन कायदे केले आहेत.  परंतु अंमल बजावणी अभावी हे कायदे कुचकामी होतांना दिसत आहेत. या साठीच शासनाने ब्रह्मकुमारी संस्थे सारख्या अनेक संस्थांना हाताशी धरून जनजागृतीचे कार्य सुरु केले आहे. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर  व्यसन मुक्ती व मूल्य शिक्षण अभियानातून तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे -- असे प्रतिपादन माझा भारत व्यसन मुक्त भारत अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक व कार्पोरेट ट्रेनर डॉ. सचीन  परब यांनी केले. 

 
माझा भारत व्यसन मुक्त भारत अभियान अंतर्गत  मूल्य शिक्षण व  व्यसनमुक्ती  हा प्रकल्प  ब्रह्माकुमारी  सेवाकेंद्राच्या येथील  मुख्य संचालिका राज्योगिनी ब्रह्माकुमारी  वासंती दीदी यांच्या अध्यक्षते खाली राबविण्यात येत असून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालय मधून याची जागृती करण्यात येत आहे. येथील  प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वा विद्यालय तर्फें मराठा विद्या प्रसारक च्या भाटीया कोलेज मध्ये  राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांनसाठी मूल्य शिक्षण व व्यसन मुक्ती या विषयावर डॉ.  सचिन परब यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. व्ही.जे. मेघने व प्रमुख पाहुणे म्हणून राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीरा दीदी,  ब्रह्माकुमार सुरेश साळुंखे, ब्रह्माकुमार सावकार आदि  उपस्तीत होते. प्रास्ताविक प्रा. प्रकाश पगारे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ एल. डी. जाधव, आभार प्रा. सुनिता आडके यांनी केले.  ब्रह्माकुमार विकास साळुंके यांनी यशवंतराव चावण मुक्त विद्या पीठ द्वारे चालवण्यात येणाऱ्या मूल्य शिक्षण पदविका व पदवी अभ्यासक्रमाची माहिती दिली. व्यासपीठावर या प्रसंगी बीके शिव प्रसाद, बीके संकेत, बीके दत्तराज, बीके मनोहर, बीके दिलीप, आदि कार्यकर्ते उपस्तीत होते, सूत्र संचालन प्रा. सविता आहिरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वीते साठी प्रा., चांदोरे, प्रा. एस पवार, प्रा. चव्हाण सर, प्रा. ढोले सर इ. नियोजन केले.