शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (08:26 IST)

सोशल मीडिया, तू च आमचा मार्गदर्शक असशील!.

सोशल मीडिया ठाऊक नाही असं आहे का कुणी?
वापर त्याचा माहीत नाही, अस असणार का कुणी!
श्वासोच्छ्वास आहे तो सध्या च्या जगाचा,
पोरं टोर सोडा सगळेच लागलेत की नादी ह्याच्या,
घर बसल्या होतो संवाद, सर्यासोबत,
बातम्या कानी पडतात, अन दिसतात ही सोबत!
जगाच्या घडामोडींचा आढावा घेतो ,
काय कुठं चाललंय आपण ही सहभागी होतो,
कित्ती जणांना मीठ भाकर सुद्धा मिळाली बरं ह्याने,
कित्यिकांचे करीयर घडवले की मीडियाने!
योगदान विसरून कसं चालेल आपल्या जीवनातील,
सोशल मीडिया, तू च आमचा मार्गदर्शक असशील!.
.......अश्विनी थत्ते