शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

महाराणी एलिझाबेथच्या हँडबॅगचे रहस्य उलगडले

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दोन या जेव्हा केव्हा सार्वजनिक कार्यक्रमात दर्शन देतात तेव्हा त्यांच्या हातात हँडबॅग असते. जणू हँडबॅग हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग आहे. अर्थात राणी ही हँडबॅग केवळ स्टाईल म्हणून वारपत नाही तर तिच्या कामाच्या वैयक्तिक वस्तू त्यात असतात. त्याबरोबर राणी हा हँडबॅगचा वापर करून आपल्या पर्सनल स्टाफला गुप्त संदेश देत असते असा दावा रॉयल बायोग्राफर शॅली ‍बेजेल स्मिथ हिने 2012 साली लिहिलेल्या एलिझाबेथ द क्वीन, द वुमन बिहाईंट द थ्रोन या पुस्तकात केला आहे.
 
शॅलीच्या म्हणण्यानुसार राणी तिच्या हँडबॅगमध्ये चष्मा, लिपस्टीक, आरसा, पेन, मिंट गोळ्या अशा वस्तू ठेवते. कॅश सहसा ठेवत नाही. अगदीच रविवारी चर्चमध्ये जाताना पाच, दहा पौंडांच्या नोटाही ठेवते. तसेच नातवंडांनी दिलेले काही लकी चार्मसही असतात. राणी या हँडबॅगच्या माध्यामातून तिच्या पर्सनल स्टाफला गुप्त संदेश ‍देते.
 
म्हणजे राणीने एका हातातून दुसर्‍या हातात पर्स घेतली की समजायचे चालू असलेली चर्चा ती लवकरच संपवित आहे. डिनर टेबलवर पर्स ठेवली तर पाच मिनिटात हा कार्यक्रम ती संपविणार आहे. राणीने पर्स जमिनीवर ठेवली तर सुरू असलेल्या कार्यक्रमात ती कंटाळली आहे. मग तिचा स्टाफ काही तरी कारण काढून तिला तेथून दूर नेतो. राणीच्या संग्रहात 200 हँडबॅग आहेत.
 
या हँडबॅगचे हँडल नेहमीपेक्षा थोडे अधिक लांबीचे असते कारण यामुळे राणीला हस्तांदोलन करताना अडचण येत नाही. राणीच्या हँडबॅगमध्ये मोबाइलही असतो असेही शॅलीचे म्हणणे आहे.