या गुहात आजार होतात छू मंतर, औषधांची गरज नाही
आज जगभरात अनेक लोक विविध प्रकारच्या व्याधीनी दुखण्यांनी त्रस्त आहेत व डॉक्टर्स त्यांच्यावर रूग्णालयातून उपचार करत आहेत. मात्र जगात अशा काही गुहा आहेत जेथे जाऊन औषधांशिवायच रोगमुक्ती मिळविता येते. या गुहेच्या वातावणात प्रवेश करताक्षणीच आजार छू मंतर केल्यासारखे गायब होतात. विकसित राष्ट्रांच्या यादीत असलेल्या ऑस्ट्रीया मध्ये अशी गुहा गास्तिन येथे आहे.
या गुहांचा शोध योगायोगानेच लागलेला आहे. वास्तविक येथे सोन्याच्या शोधात लोक आले मात्र त्यांना सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान चीज येथे मिळाली. या गुहांमध्ये अगदी अल्प प्रमाणात नैसर्गिक रित्याच रेडॉन गॅस उर्त्सजित होतो. हा रेडिओअॅक्टीव्ह आहे व गुहेच्या गरम वातावरणात रोगी येताच या गॅसमुळे त्यांच्या व्याधी समूळ नष्ट होतात. औषधे न घेताच ही रोगमुक्ती मिळते. या गुहांची प्रसिद्धी वेगाने पसरत असून युरोप, जर्मनी, मध्ययुरोपमधूनही अनेक लोक उपचारासाठी येथे येतात. विशेष म्हणजे आथ्रायटीस, पॅरालिसिस सारखे घाताक आजार बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्के आहे. हा मेडीकल क्षेत्रात चमत्कार मानला जातो.
या गुहातून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे सफेद कोट घालून डॉक्टर्सही असतात. रूग्णांसाठी लाकडी बाके टाकली गेली असून येथे काही काळ नुसते पडून राहिले की आजार कमी होत असल्याचा अनुभव रूग्ण घेतात.