गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (15:26 IST)

Two Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय?

महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.
 
लक्षात घेण्याजोगा मुद्दा तेव्हा येतो जेव्हा बलात्कार पीडितांना 2 फिंगर टेस्ट घेण्यास सांगितले जाते. कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण कधी कधी बलात्कार पीडितेची ही चाचणी केली जाते तसेच चाचणीच्या नकारात्मक बाजूवर वेळोवेळी चर्चा झाली आहे.
 
सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही यावर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबर रोजी बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ‘टू फिंगर टेस्ट’ घेण्यास स्थगिती दिली आहे. न्यायालयाने याला गुन्हा म्हणून वर्गीकृत केले आहे. असे करणाऱ्यांना दोषी मानले जाईल. मात्र न्यायालयाने यापूर्वीच याबाबत आदेश जारी केले होते.
 
पूर्वी अशी समजूत होती की जर दोन्ही बोटे सहजपणे प्रायव्हेट पार्टमध्ये गेली तर स्त्रीने सेक्स केल्याचे समजते. याला महिलेचे व्हर्जिन असल्याचा किंवा नसल्याचा पुरावा मानला जातो.
 
Two Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय?
प्रथम आपण टू फिंगर टेस्ट म्हणजे काय हे जाणून घेऊ या. नावाप्रमाणेच टू फिंगर टेस्ट यामध्ये पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन बोटे घालून कौमार्य चाचणी केली जाते.
 
या चाचणीत पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन बोटे घालून तिच्या कौमार्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. चाचणी घेऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध बनवण्यात आले आहे की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. 
 
2018 मध्ये, UN आणि WHO ने देखील महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी 'टू-फिंगर टेस्ट'वर बंदी घालण्याची मागणी केली होती. या चाचणीने कौमार्य तपासता येत नाही, असा विश्वास डब्ल्यूएचओचा आहे.
 
या चाचणीला काही शास्त्रीय आधार आहे ?
या चाचणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. स्त्रियांच्या व्हर्जिनिटीमध्ये हायमेन इनटॅक्ट झाल्याने बलात्कार झाला आहे की नाही हे सिद्ध होत नाही, असे विज्ञानाचे मत आहे. बंदी असल्यावरही ही चाचणी आपल्या समाजाचे सत्य सांगते
 
2013 मध्येच या चाचणीवर बंदी घालण्यात आली होती, परंतु असे असतानाही अनेक घटनांमध्ये या चाचणीचा उल्लेख आपण ऐकला आहे. असे होणे चुकीचे आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
 
आरोग्य मंत्रालयानेही आदेश जारी केला आहे
आरोग्य मंत्रालयानेही या चाचणीला अवैज्ञानिक म्हटले आहे. मार्च 2014 मध्ये मंत्रालयाने बलात्कार पीडितांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती, ज्यामध्ये ही चाचणी बेकायदेशीर घोषित करण्यात आली होती.
 
या चाचणीची सुरुवात कधीपासून झाली?
1898 मध्ये एल थॉइनॉट यांनी ही चाचणी सुरू केली होती. या चाचणीअंतर्गत असे सांगण्यात आले की संमतीने लैंगिक संबंधात हायमेन त्याच्या लवचिकतेमुळे तुटत नाही, तर बळजबरीने बलात्काराने तो मोडला जातो.
 
मुली जेव्हा पहिल्यांदा सेक्स करतात तेव्हा हायमेन फाटल्याने त्यांच्या योनीतून रक्तस्त्राव सुरू होतो. असं घडतंच हे देखील आवश्यक नाही. काही महिलांचे सेक्स करण्यापूर्वी त्यांचे हायमेन तुटलेलं असतं. अनेक वेळा व्यायाम करताना किंवा खेळताना अनेकदा हायमेन तुटतो.
 
बलात्कारानंतर कोणत्याही महिलेची चाचणी घेणे हे कोणत्याही किंमतीवर योग्य पाऊल नाही. अशात कोर्टाने देखील म्हटले की ही चाचणी ‘सेक्शुअली अॅक्टिव्ह स्त्रीवर बलात्कार होऊ शकत नाही’ अशी मानसिकता दर्शवतं. ही चाचणी देणे केवळ वैचारिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही स्त्रीला पुन्हा त्रास देण्यासारखे आहे.

Edited by: Rupali Barve