Dharma Sangrah

मी कोण आहे?

Updated: सोमवार, 30 एप्रिल 2018 (13:42 IST)
 
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः
यत्रै नास्तुन पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः||
 
प्राचीन मनुस्मृति मध्ये स्त्रियांचे महत्त्व सांगितले गेले आहे की जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो आणि जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे सर्व धर्म-कर्म निष्फल होतात. आश्चर्य म्हणजे असे उच्च विचार असलेल्या या देशात स्त्रीसोबत भयानक अत्याचार घडत असतात. 
 
मनुस्मृति मध्ये सांगितले गेले आहे की
किद्विधा कृत्वाऽऽत्मनस्तेन देहमर्धेन पुरुषोऽभवत्।
अर्धेन नारी तस्यां स विराजमसृजत्प्रभुः||
 
अर्थात त्या हिरण्यगर्भाने आपल्या शरीराचे दोन भाग केले, अर्ध्याने पुरुष तर दुसर्‍या अर्ध्या भागाने स्त्री निर्मित झाली. घर, ऑफिस आणि देश सांभणार्‍या स्त्रीला ज्या देशात बरोबरीचा दर्जा देण्यात आला त्या देशात स्त्रीसोबत होत असलेली दुर्दशा बघून काय आपल्या मनात वेदना होत नाही... 
 
साम्राज्ञी श्व्शुरे भव साम्राज्ञी स्वाश्र्वां भव ।
ननान्दरी साम्राज्ञी भव साम्राज्ञी अधि देवृषु ॥
 
ऋग्वेदामध्ये स्त्रीला कुटुंबाची स्वामिनी, साम्राज्ञी पदवी देत म्हटले आहे की मानव जीवनाच्या प्रगतीसाठी स्त्रीचा सहयोग आवश्यक आहे.
 
आज आवश्यकता आहे की धर्माच्या नावाखाली आंडबर करणार्‍या आमच्यासारख्या लोकांनी स्त्रीला तेच स्थान, प्रतिष्ठा देण्यासाठी पुढे येण्याची. वर्तमान परिस्थितीत तर धर्म प्रमुखांवर स्त्री शोषणाचे आरोप सिद्ध होत आहे. आसाराम असो किंवा राम रहीम, नित्यानंद असो किंवा रामपाल.. नावं वाढतच चालले आहेत.
 
पण काय आम्ही स्त्रीला पुन्हा तो मान देण्यात सक्षम नाही? किंवा आम्ही वाट बघत आहोत त्या दिवसाची जेव्हा सर्जनकरता स्त्रीच्या गर्भातून पुरुषाला जन्म घालण्यापासून वंचित ठेवे.
 
पाळण्यातील चिमुकलीदेखील विकृत मानसिकतेला बळी जात आहे आणि वयातील 80 व्या वर्षाची वृद्धादेखील या देशात आपली अब्रू घालवून देशाच्या सतत ढवळत असलेल्या चरित्रावर लाचार दिसून येत आहे. विवाहित असो वा नोकरी करणार्‍या, मॉर्डन असो वा पल्लु काढणारी, शहरातील असो वा गावातील, किशोरी असो वा तरुण, गर्भवती असो वा कुमारिका, प्रत्येक वयोगटातील स्त्रीसोबत पुरुषांनी केलेले अत्याचारांचे आकडे जुळलेले आहे आणि लज्जास्पद म्हणजे सतत वाढत आहे.
 
वेबदुनियाने वेळोवेळी सामाजिक विषय व लैंगिक संवेदनाशीलतेवर आपल्या स्तरावर सतत आवाज उचलेली आहेत. आज पुन्हा वेबदुनियाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक स्त्रीचे आपल्यासाठी काही प्रश्न. हृद्याला हादरवणार्‍या या व्हिडिओला एकदा नक्की बघा...

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments