World Animal Day 2025 जागतिक प्राणी दिन
World Animal Day 2025 : जागतिक प्राणी दिन दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्राण्यांचे संरक्षण, त्यांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्याप्रती मानवतेची जबाबदारी याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, जे प्राण्यांचे आणि पर्यावरणाचे संरक्षक मानले जातात.
जागतिक प्राणी दिन महत्त्व-
प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे. तसेच प्राण्यांवरील क्रूरता, शिकार आणि पर्यावरण नाश याविरुद्ध जागरूकता निर्माण करणे. व जैवविविधतेचे संरक्षण आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करणे. तसेच प्राणी कल्याण मोहिमांना पाठिंबा देणे. व स्थानिक प्राणी आश्रयस्थानांना भेट देणे किंवा दान करणे.
तसेच प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार रोखण्यासाठी आणि प्राण्यांच्या कल्याणाची आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी कल्याण दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिन प्रथम 4 ऑक्टोबर 1929 रोजी साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात जर्मन लेखक आणि प्रकाशक हेनरिक झिमरमन यांनी प्राणी कल्याणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी केली.
Edited By- Dhanashri Naik