हे वसुंधरे कित्ती देशील आम्हास...
हे वसुंधरे कित्ती देशील आम्हास,
कण कण तुझा ग माते येतो कामास,
काय काय पेलले स ग तू अंगावरी,
सल जरी ना दिसे तुझ्या चर्येवरी,
मखमली शालू लेवून कधी दिसतेस,
वाळूचे ढीग अंगावर घेऊन कुठं असतेस,
कित्ती जीवांची तू आई होऊन कवेत घेते,
लाखमोलाचे खनिजे अंतरी साठविते,
अमूल्य तुझे योगदान मानवाच्या जीवनी,
झाडांच्या रुपात सर्वांना मिळते
संजीवनी,
एक झाड लावून आयुष्य जगवावे मनुष्याने,
तू परतफेड करते त्याची, कित्ती पटीने,
तर शक्यच नाही पांग तुझे कुणा!
शब्द कमी हे पडतील, गावया तुझीया गुणा!
......अश्विनी थत्ते.