ganesh chaturthi
✕

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल

Published: शनिवार, 5 जून 2021 (09:45 IST)
 
* ऊर्जा वाचविण्यासारख्या गोष्टी कडे लक्ष द्या जसे कमीत कमी वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर करा. कॉम्प्युटरला हायबरनेट मोड वर ठेवल्याने ऊर्जा वाचते असे काही नाही पण कार्बनचे उत्सर्जन अजून वाढते. काही काम नसल्यास कॉम्प्युटरला बंद करून ठेवावे. असे करणे सर्वांसाठीच फायदेशीर आहे. आणि संगणकासाठी देखील.
 
* वीज कमी वापरा. ग्रीन लेबलची उपकरणे वापरा,  कमी खप असलेल्या बल्बचा वापर करण्याची सुरुवात भारतात झाली असून त्यांचा किंमतींत घट करण्याची आणि अश्या प्रकल्पांना दत्तक घेण्याची गरज आहे. यासाठी घरातील वीज कनेक्शनला जोडण्यासाठी मीटर मदत करेल. दुसरीकडे ऊर्जा कार्यक्षमता विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे फ्रीज, एसी, कूलर, हीटर, इस्त्री, ओव्हन सारख्या उपकरणांवर आता ग्रीन लेबल दिसू लागले आहेत. हे लेबल हे दर्शवते की हे उपकरण किती प्रमाणात वीज वापरेल. विकत घेण्याआधी ग्रीन लेबल बघून घ्या.
 
* कमी इंधनाचे उपकरण वापरा. कधी कधी आपण उपयोगात नसलेले वाहने उपकरण आपल्या घरात ठेवत असतो. जर का ते जास्त प्रमाणात वीज आणि इंधन घेत आहे जसे की जुने स्कुटर, कार, जीप, पंखे किंवा जुनी झालेली डिझेल मोटार. जे सामान्यांपेक्षा जास्त वीज खपत करतातच त्याच बरोबर कार्बन उत्सर्जनामध्ये त्यांचा वाटा असतो तर अश्या गोष्टींना आपल्या घरातून काढून टाकावे. जेणे करून आपल्या वीज इंधन आणि पैसे वाचतील. हाताने चालणाऱ्या उपकरणांचा अधिक वापर करावा.
 
* बायोगॅस प्रकल्पाला घरी आणा. सूर्याची ऊर्जा, पवनची ऊर्जा आणि शेणापासून निर्मित बायोगॅस आणि वीज हे प्रत्येक घरात असलेलं चांगलं विकल्प आहे. हे लाकूड, गवऱ्या, आणि कोळशाच्या चुली पासून सुटका देतात. तर मग सूर्यदेव, पवनदेव आणि पशूंपासून मिळणाऱ्या शेणाचे आभार मानून बायोगॅस ऊर्जेला घरोघरी आणण्यासारखा कार्याला लागावे.
 
* भौगोलिक ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाचे विश्लेषण करा. वैज्ञानिक सांगतात की ज्वालामुखीं मध्ये वीज निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. अंदमान निकोबार सारख्या भारतीय बेटांमध्ये अनेक ज्वालामुखी जमिनीच्या गर्भात निजलेल्या अवस्थेत असून यावर विचार केला जाऊ शकतो.  हायड्रोजनचे उत्पादन आणि त्याचे संग्रह एक मोठी समस्या आहे पण हायड्रोजनाने चालणाऱ्या दुचाकी किंवा तीनचाकी वाहने हे चांगलं पर्याय म्हणून असू शकेल का, यावर विचार करावा.
 
* कमी इंधनाचा वापर करणारे वाहन वापरा. सध्या हायब्रीड वाहनांचा काळ आहे जे कमी प्रमाणात इंधन खातात. काळे विषारी धूर सोडत नाही. लाल दिवा आल्यावर आपोआप बंद होतात. आपल्या वाहनांना अश्या यंत्रणेसह बाजारपेठेत येऊ देण्याचा दिशेने कार्य करायला पाहिजेत.
 
* सार्वजनिक वाहनांचा आदर्श ठेवावा. सार्वजनिक वाहनांना सर्व सोयीसह आणि आरामशीर प्रवास करण्यासाठी उपयुक्त बनविणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर शासनाने आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वाहन भत्त्यामध्ये कपात करून घरापासून कमीत कमी अंतरावर नियुक्ती आणि बदलीचे धोरण अमलात आणून इंधन खर्चात आणि खपत मध्ये बचत करू शकतो. जवळपास जाण्यासाठी आपण सायकल देखील वापरू शकता.
 
* वीट, सिमेंट, स्टीलच्या रचना कमी करून ग्रीन फ्रेम वापराव्यात. वीट, सिमेंट आणि स्टील हे कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढविण्यास जवाबदार आहे. ह्यांना बनवताना लागणाऱ्या इंधनाचे वापर जास्त न करू शकल्याने या घटकांनाच दोषी मानले जाते. या ठिकाणी हिरव्या रचना उपर्युक्त ठरतात. एखादी जागतिक आपत्ती आल्यास या कुठल्याही बांधकामाची नासाडी होते. परत ते बांधण्यासाठी खर्च करावा लागतो. आपत्ती व्यवस्थापनाद्वारे हा खर्च रोखला जाऊ शकतो.
 
* गावाचे शहर करू नये. वाढते स्वप्न, वाढते खर्च आणि वाढणारे बाजारपेठ याचा अर्थ असे नाही की गावात आणि शहरांमध्ये भेद करू नये. त्यासाठी शहराला गावासारखं बनवा, गावाला शहर बनू देऊ नका.
 
* पॉलिथिनचा वापर करू नये. पॉली कचरा आणि ई कचरा हे दीर्घकालीन विष आहे. हे जाळणे आणि माती खाली पुरणे हे विषारी आहे. सहस्त्र वर्षानंतर आपल्या वंशजांनी जमीन खणल्यावर त्यांना कचरा दिसला तर आपला समजा असभ्य असल्याचे कळून येईल. पॉलिथिनच्या ऐवजी कागदाचा वापर करावा आणि आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवा.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

World Cotton Day 2026 जागतिक कापूस दिवस का साजरा केला जातो? इतिहास थीम आणि महत्त

LIVE: पोलीस दलांचा सन्मान, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ

पुणे महापौरांचे रोहित पवार यांना' पुणे बंद'ची धमकी दिल्यानंतर उघड आव्हान

उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सर्व आठ राज्यसभा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा आणि का साजरा केला जातो इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments