1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. World Environment Day 2026 Quotes in Marahti

World Environment Day 2026 Quotes in Marathi जागतिक पर्यावरण दिन कोट्स

निसर्गाचा ठेवा जपून ठेवू, 
प्रदूषणापासून पृथ्वीला मुक्त करू; 
चला, मिळून एका सुंदर आणि 
हिरव्यागार भविष्याकडे पाऊल टाकू
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
 
पृथ्वी आपल्याला जगण्यासाठी सर्व काही मोफत देते,
पण तिचे रक्षण करणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे
निसर्गाचा आदर करा, पर्यावरणाचा सन्मान करा
 
झाडे लावूया, हवा शुद्ध ठेवूया 
आणि वसुंधरेच्या सौंदर्याला कायम जपूया
निसर्ग रक्षणासाठी आजच एकजुटीने पाऊल पुढे टाकूया
 
पर्यावरण हा केवळ एक विषय नाही, 
तर तो आपल्या अस्तित्वाचा पाया आहे
आज जर आपण निसर्गाला वाचवले, 
तर उद्या निसर्ग आपल्याला वाचवेल
 
वामानातील बदल हे निसर्गाचे संकट नसून 
मानवाच्या चुकांचे परिणाम आहेत
प्रदूषण कमी करूया,
पृथ्वीला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ देऊया
 
उज्ज्वल भविष्याची एकच हमी, प्रदूषण करा कमी
प्लास्टिकचा वापर टाळा आणि वसुंधरेला विनाशापासून वाचवा
 
निसर्गाकडून प्रेरणा घेऊया, हवामानाचे रक्षण करूया 
आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांना एक सुरक्षित आणि हिरवीगार पृथ्वी भेट देऊया
 
झाडे आहेत पर्यावरणाचे खरे आभूषण, 
जे मुळापासून नष्ट करते वाढते प्रदूषण
चला, प्रत्येक घरात एक झाड लावण्याचा संकल्प करूया
 
आपल्या मुलांना केवळ पैशांची संपत्ती नको, 
तर शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सुपीक मातीची खरी संपत्ती द्या
पर्यावरण रक्षणाची हीच खरी दीक्षा आहे
 
निसर्गाचे नियम सोपे आहेत; 
तुम्ही त्याला जपाल तर तो तुम्हाला समृद्ध करेल, 
आणि जर त्याचा नाश कराल तर सर्वनाश निश्चित आहे
निवड आपली आहे!
 
खराखुरा नारायण म्हणजेच आपले पर्यावरण!
झाडे तोडून जंगले नष्ट करू नका, 
कारण जंगल संपले तर मानवाचे अमंगल व्हायला वेळ लागणार नाही
 
पर्यावरण दिनाचा दिवस आहे खास, 
निसर्ग रक्षणाचा मनाशी घेऊया ध्यास
आपल्या छोट्या छोट्या सवयी बदलूया 
आणि पृथ्वीला सुंदर बनवूया!
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा