कृती-- एका कढईत नारळाचा किस, मावा, साखर व तूप घेऊन मंद आचेवर एकसारखे हलवत रहा. हलवत असताना एकाच दिशेने हलवा. हे मिश्रण फुलायला लागले की गॅसवरून उतरवून घ्या. तूप लावलेल्या ताटात वरील मिश्रण काढून घ्या. वरून बदाम व पिस्त्याचे काप पसरवा व गरम असतानाच कापून घ्या. हवा बंद डब्यातच भरा.