गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

रांगोळीचे रंग देशभर

NDND
भारतीय लोककलेच्या परंपरेत रांगोळीचे महात्म्य वर्षानुवर्ष सांगितले जाते. हजारों वर्षापासून भारतीय गृहिणी सणांना व कोणत्याही शुभ प्रसंगी देवी-देवतांच्या पुढे रांगोळी सजवत आहेत. घराच्या दरवाजापासून अंगणापर्यंत रांगोळी सजविण्याची परंपरा चालत आलेली आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारताच्या कानाकोपर्‍यात ही परंपरा आहे. काळानुरूप नावात बदल झाला असला तरी या मागील भावना आजही त्याच आहेत.


रांगोळीच्या नक्षी निसर्गातूनच घेतल्या जातात. यात पक्षी, फळं, फुलं, पानं यांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. दरवाजासमोर व फरशीवर चित्रकलेचा वापर करून रांगोळी काढली जाते. भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तर्‍हेने फरशीवर चित्र रंगविले जाते.

NDND
रांगोळी शब्द मुळात दोन शब्द रंग+ अवळी यांनी बनतो. यात अवळीचा मूळ अर्थ रंगांची रांग असा आहे. रांगोळीची परंपरा महाराष्ट्रातून सगळीकडे पसरली आहे. परंतु, आज मात्र रांगोळी देशातील प्रत्येक राज्यात सजते. पश्चिम भारतातील (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान) रांगोळी पूर्व भारतापेक्षा (बंगाल, ओरीसा, हिमाचल प्रदेश) खूप वेगळी आहे. पूर्व भारतात रांगोळी अल्पना या नावाने ओळखली जाते. ती तांदुळ व इतर धान्याच्या कणकेने सजविली जाते. दक्षिण भारतात (तमिळनाडू, कर्नाटक, केरळ) रांगोळी कोलम नावाने प्रसिध्द आहे. ही रांगोळी सममिती व ज्यामितीय आकारात फरशीवर काढली जाते.

रांगोळीच्या नक्षी निसर्गातून घेतली जाते. यात निसर्गातील पक्षी, फळे, फूल, पान यांचा वापर करून रांगोळी सजविली जाते. यात रंगही निसर्गातूनच घेतले जातात. आता रांगोळीतील रंगांमध्ये सिंथेटिक रंगांचा वापर केला जातो. रांगोळीत रंगीत तांदूळ, हळद, मिरची पावडर, यांचा उपयोग केला जातो. काही कलाकार फक्त किनारेच चित्रित करता‍त.