मराठी साहित्य संमेलन सुरू होऊन दुसरे शतक उलटले तरी मराठीच्या मुमूर्षूपणाची चिंता काही सरलेली नाही. दर अधिवेशनात मराठीसंदर्भात चिंता व्यक्त करणारा एक तरी परिसंवाद ठेवण्याची प्रथा पाळली जाते आहेच. दुसरीकडे राजकीय आखाड्यातही मराठी हे हॉट मार्केट झाली आहे. दोन राजकीय पक्ष तिने जन्माला घातले आहेत. त्यांनी मराठीचा परवाना फक्त आपल्याकडेच...