मुखी तांबुल पाचशे पानांचा । मुखकमली रंग लालीचा । खणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक्त येती ॥
विष्णुदासाची गं विष्णुदासाची विनवणी तुला । माझ्या जनार्दनी चरणी माता भगिनींना गं माता भगिनींना सौभाग्यदायी व्हावे अखंड अखंडीत पावनी सदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक्त येती ॥