शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (08:37 IST)

इंजिनिअरिंग नंतर देखील मिळेल सरकारी नोकरी

आज नोकरीचे असंख्य पर्याय उपलब्ध असले तरी सरकारी नोकरीचं आकर्षण अद्यापही कमी झालेलं नाही. सरकारी नोकरीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. सरकारी नोकरी म्हणजे भरपूर पगार आणि आर्थिक स्थैर्य ही संकल्पना समाजमनात दृढ झालेली आहे. इंजिनिअरिंग नंतरही तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. इंजिनिअरिंगच्या कोणत्या शाखा सरकारी नोकरीत चांगली संधी देतात याविषयी जाणून घेऊ या.
 
* ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग'मध्ये पदवी मिळवल्यानंतर तुम्हाला खासगी क्षेत्रात अनेक संधी मिळत असल्या तरी सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर राज्य विद्युत महामंडळ, भारतीय रेल्वे, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या ठिकाणी अर्ज करू शकता.
* ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग' नंतर भारतीय हवाई दल, रेल्वे, लष्कर, डीआरडीओ, भेल, पीडब्ल्यूडी अशा ठिकाणी सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी मिळते.
* ‘बायोटेक्नॉलॉजी'चे विद्यार्थी फॉरेन्सिक विभागात नोकरी करू शकतात. या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी सरकारकडून निधीही मिळतो.
* ‘सिव्हिल इंजिनिअरिंग' करून वाहतूक क्षेत्रात करिअर करता येईल. तसंच पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार्या  शासकीय संस्थांमध्येही संधी आहेत.
अभय अरविंद