शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (08:11 IST)

मुंबई पालिका ३ हजार बेडची खरेदी करणार

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पालिका आयुक्त इक्बाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या आदेशाने मुंबईतील पालिकेच्या सर्व रुग्णालयांची क्षमता वाढविण्यात येत आहे. तसेच पालिकेच्या जंबो कोविड सेंटरची क्षमताही वाढविण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक साधन, सामग्री खरेदी करण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया केली. 
 
पालिका, जंबो कोविड सेंटर आणि विविध रुग्णालयांसाठी ३ हजार बेडची खरेदी करणार आहे. मे.जे.डी. हेल्थकेअर या कंत्राटदरकडून ३ हजार बेड खरेदी करणार आहे. त्यासाठी एका बेडसाठी ६ हजार ३७० रुपये याप्रमाणे १ कोटी ९१ लाख १० हजार रुपये कंत्राटदाराला मोजण्यात येणार आहेत. 
 
मुंबई महापालिका मे.जे.डी. हेल्थकेअर याच कंत्राटदरकडून २ हजार बेड लॉकरची सुद्धा खरेदी करणार आहे. त्यासाठी एका बेड लॉकरकरिता ४ हजार ७५० रुपये याप्रमाणे ९५ लाख रुपये कंत्राटदाराला मोजण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, मे. व्ही.जमनादास एन्ड कंपनी या कंत्राटदाराकडून ३ हजार आय.व्ही. रॉडची खरेदी करण्यात येणार आहे. त्याकरिता, एका आय. व्ही. रॉडसाठी १ हजार १८ रुपये याप्रमाणे ३० लाख ५४ हजार रुपये मोजण्यात येणार आहेत.