शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:48 IST)

मुंबई पालिका प्रशासनाने ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली

मुंबई महापालिकेच्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र पालिका प्रशासनाने या मृत कर्मचाऱ्यांपैकी ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली त्याचप्रमाणे ६७ वारसदार कुटुंबांना प्रत्येकी ५० लाखाची आर्थिक मदत करून मोठा आधार दिला आहे. 
 
पालिकेची सेवा बजावताना पालिकेच्या विविध खात्यातील ६ हजार २८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाशी लढा देणाऱ्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
त्यामुळे पालिकेने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, मृत कर्मचारी, अधिकारी यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत करण्यात आले. तर कोरोना विरोधातील या लढ्यात रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन ५ हजार ३६३ अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले.