सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (19:45 IST)

तरुणांसाठी बँकेमध्ये जॉब

jobs
बँक ऑफ बडोदा इथे विविध पदांसाठी 105 हून अधिक रिक्त जागांसाठी नोकरीची संधी आहे. जाहिरातीनुसार 4 मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर आजच ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरू शकता. वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च असणार आहे. 
 
तुम्ही जर इच्छुक उमेदवार असाल तर bankofbaroda.in या वेबसाईटवर भेट द्या. तिथे लॉग इन करावं लागणार आहे. तुमची संपूर्ण माहिती आणि तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते डिटेल भरा आणि शुल्क भरून फॉर्म जमा करा. 
 
मॅनेजर 15 , क्रेडिट ऑफिसर 40 पदं, क्रेडिट एक्सपोर्ट/इन्पोर्ट बिजनेस 20 पदं, फॉरेक्स अॅक्विझिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर 30 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांना 600 रुपये अर्जाचा शुल्क भरायचा आहे. तर  एससी / एसटी / दिव्यांग / महिला उमेदवारांसाठी  100 रुपये शुल्क भरायचं आहे. 
 
शैक्षणिक पात्रता - मॅनेजर पदासाठी B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA शिवाय 3 वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे. क्रेडिट ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, 8 वर्षांचा अनुभव किंवा CA / CMA / CFA असणं आवश्यक आहे. 
 
 क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस पदासांठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी, CA / CMA / CFA यापैकी काहीही चालणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करा आणि बँकेत नोकरी करण्याची संधी चुकवू नका.