शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (20:39 IST)

Gramsevak Recruitment 2022 :राज्यात 10 हजार ग्राम सेवक पदांची भरती

jobs
Gramsevak Recruitment : ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Bharti) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.राज्यात ग्रामपंचायतीसाठी ग्राम सेवकांची कमतरता असल्यामुळे शासनाने 10 हजार ग्राम सेवक पदांसाठी भरती करण्याची घोषणा केली असून त्याच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. 

राज्यातील ग्रामविकास सरळसेवेच्या विभागात रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादे पर्यंत रिक्तपदांची भरती होणार आहे. हे वित्त विभागाच्या निर्देशानुसार, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहणार आहे. भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. 30 सप्टेंबर, 2022 नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
 
1 ते 7 फेब्रुवारी2023 दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढे 22 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील. 23 फेब्रुवारी ते 1मार्च2023 दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर 2 ते 5 मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 6 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर 14 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. 1 मे ते 31 मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत.
हे वेळापत्रक सर्व जिल्हा परिषदेला पाळावे लागण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in वर जाऊन अधिक माहिती मिळवता येईल.
 
 Edied By - Priya Dixit