शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (20:07 IST)

Indian Army Recruitment Rally 2021: या पदांच्या रजिस्‍ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरू joinindianarmy.nic.in वर अर्ज करा

Indian Army RecruitmentRally 2021: विविध पदांसाठी भारतीय सैन्य भरती रॅली2021 आजपासून सुरू झाली आहे. यावेळी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या इच्छुकांना अर्ज करायचा आहे ते joinindianarmy.nic.inवर विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. भारतीय सैन्य भरती रॅली २०२१ विविध पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी खुली आहे- सैनिक सामान्य ड्यूटी, सैनिक लिपिक, स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, टेक्निकल (एव्हिएशन 'एक्स' ग्रुप), नर्सिंग असिस्टंट आणि नर्सिंग असिस्टंट (पशुवैद्यकीय)कॅटेगरीजवर  लागू करू शकतात. सांगायचे म्हणजे की ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्याबरोबरच उमेदवारांना केवळ एकाच वर्गात सहभागी होण्याची संधी मिळेल. उमेदवार केवळ एका श्रेणीमध्ये अर्ज करू शकतात.
 
महत्वाच्या तारखा :
पंजाबः 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2021
हरियाणा: 14 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021
आंध्र प्रदेशः 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2021
गुजरातः 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021
देशातील कोविड-19 परिस्थितीमुळे या तारखांमध्ये आणि ठिकाणांमध्येही बदल होऊ शकतो.
 
ठिकाणे आणि तारीख :
पंजाब(Punjab) :
फतेहगड साहिब, बरनाला, मानसा, संगरूर आणि पतियाळामधील लोकांसाठी 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान पतियाळा इथल्या 1 एडीएसआर मैदानावर (फ्लाइंग क्लबच्या समोर, पटियाला-संगरूर रोड)भरती प्रक्रिया पार पडेल.
हरियाणा (Haryana) :
भिवानी,चरखी दादरी, महेंद्रगड आणि रेवाडी जिल्ह्यातील लोकांसाठी भिवानी इथल्या भीम स्टेडियमवर 14 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत भरती होईल.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) :
श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि यनम जिल्ह्यातील लोकांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, विशाखापट्टणमच्या इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे.
गुजरात (Gujrat) :
आणंद, वलसाड, तापी, डांग, नवसारी, साबरकांठा, वडोदरा, मेहसाणा, सूरत, बनसकांठा, नर्मदा, महिसागर, अहमदाबाद, गांधीनगर, अरवली, छोटा उदयपूर, भरूच, खेडा, दाहोद, पंचमहाल जिल्ह्यासह दमण, दादरा आणि नगर हवेली केंद्र शासित प्रदेशातील लोकांसाठी हा भरती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. गोधरा, पंचमहाल इथल्या कानेलव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे.