शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (11:40 IST)

LIC Recruitment 2023: LIC मध्ये नौकरीची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा

LIC Assistant Administrative Officer Recruitment 2023: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने नियुक्तीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी  या पदांवर ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट licindia.in द्वारे फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 
 
 तपशील
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या 300 जागांवर भरती होणार आहे.
 
 शैक्षणिक पात्रता - 
भारतीय आयुर्विमा महामंडळात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावे.
 
वयोमर्यादा-
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
 
 अर्ज फी-
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु 700 भरावे लागतील. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 85 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 
 
 परीक्षा स्वरूप आणि पगार
उमेदवारांची निवड तीन टप्प्यात होईल. LIC AAO 2023 ची प्राथमिक परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि ती ऑनलाइन घेतली जाईल. यानंतर उमेदवाराला मुख्य परीक्षेला बसावे लागेल. मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना रु.53600 पगार दिला जाईल. याशिवाय इतर सुविधाही उपलब्ध होणार आहेत. 
 
 महत्त्वाच्या तारखा-
ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज शुल्क जमा करण्याची सुरुवातीची तारीख - 15.01.2023
ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज शुल्क जमा करण्याची सुरुवातीची तारीख - 31.01.2023 
परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी परीक्षेसाठी प्रवेशपत्र
ऑनलाइन परीक्षेच्या तारखा (पूर्व परीक्षा) 17.02.2023 ते 20.02.2023 
ऑनलाइन परीक्षेच्या तारखा (मुख्य परीक्षा) 18.03.2023
 
Edited By- Priya Dixit